Pages

Sunday 17 May 2020

Epidemic Diseases Act 1897 (महामारी कायदा १८९७)

 *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*


❇️ Epidemic Diseases Act 1897 (महामारी कायदा १८९७)


COVID-19 विषाणूचा प्रसार थांबावा यासाठी महाराष्ट्र सरकारने १३ मार्च रोजी epidemic act म्हणजेच *‘महामारी कायदा-1897’ याच्या कलम 2 मधील तरतुदींना लागू  केल्या आहेत.*


 या कायदातील कलम 2(A)  असं सांगतो की जेव्हा एखाद्या राज्यात किंवा ठराविक प्रदेशामध्ये घातक असा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा होण्याची संभावना आहे , आणी त्या वेळी अंमलात असलेले कायदे या रोगाचा प्रसार प्रतिबंध करण्यासाठी अपुरे आहेत असे वाटत असेल तेव्हा राज्य शासन अशा रोगाचा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक वाटतील ते उपाययोजना करू शकेल. जाहीर नोटीशीद्वारे आवश्यक वाटतील असे तात्पुरते निर्बंध विहित करून , जनतेने किंवा कोणत्याही वर्गातील लोकांना पालन केले पाहिजे असे फर्मावू शकते.

  तसेच कलम 2(B) या तरतुदींमुळे रेल्वेने किंवा इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची तपासणी करण्याचे अधिकार, तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीला लोकांपासून वेगळे करणे, रुग्णालयात, तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतरित करणे अश्या सक्तीच्या उपाययोजना करण्याचे अधिकार देखील सरकारला देते.

     *कलम ३* हा अधिनियमान्वये विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाचे पालन न‌ करणाऱ्याला "भारतीय दंड संहिता" (१८६० चा ४५) यांच्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. 

      परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये *फक्त कलम २ लागू आहे. कलम ३ लागू नाही*.
      हा कायदा यांच्या आदी महाराष्ट्रात पुणे येथे २००९ मध्ये स्वाईन फ्लु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आला होता.
   
▪️ पार्श्वभूमी

- 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनी COVID-19 विषाणू ‘महामारी’ म्हणून घोषित केले.

     ‘महामारी रोग कायदा-1897’ पहिल्यांदा पूर्वीच्या बॉम्बे राज्यात *ब्यूबोनिक प्लेगच्या* वेळी लागू करण्यात आला होता.

               - @अभयराजे कापसे
                       Law Student
                        SPPU Pune
-------------------------------------------------
{ टिप :- वरील सर्व माहिती हि Reference Book मधुन तसेच माझ्या वाचनात आलेल्या Articles मधुन घेतलेली आहे.}

No comments:

Post a Comment