Pages

Monday 23 March 2020

Section 144 Crpc 1973 (कलम १४४ फौजदारी दंडसंहिता १९७३)*


⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*

                                                                                                                                                         ❇️ *Section 144 Crpc 1973   (कलम १४४ फौजदारी दंडसंहिता १९७३)*


महाराष्ट्र शासनाने २२ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जमावबंदी  साठी कलम १४४ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागु केले आहे.पण काय आहे कलम १४४? हे आपण जाणून घेऊ.
  
      कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
    एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.
    जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते ( काठी, तलवार व लायसन्स बंदुक इ.).  *तसेच या कलम अंतर्गत इंटरनेट सेवा बंद करण्याचे अधिकार प्रशासनाला आहे .* एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
       कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. *कलम 144 अंतर्गत १ वर्ष ते ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.* मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
    या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

✅ *जमावबंदीच्या निर्णयातून वगळलेली सेवा व क्षेत्र :-*

बॅंक, वित्तीय सेवा, दूध, धान्य, फळे, भाजीपाला, रुग्णालये, विमान, बोट, प्रसारमाध्यमे (मुद्रीत व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे), ऊर्जा, फोन, इंटरनेट, वेअर हाऊस, मेडीकल, आयटी, आयटीशी संलग्न क्षेत्र

 ➡️ कर्फ्यू आणि कलम १४४ 

 *कलम १४४ आणि कर्फ्यू मध्ये खूप फरक आहे*. कलम १४४ च्या  अंतर्गत आपणास घरातुन बाहेर फिरता येते. हे आपले दररोजचे  जिवन नियंत्रण करत नाही.  परंतु कर्फ्यू मध्ये घरातुन बाहेर पडता येत नाही, व आपल्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा येते . कर्फ्यू हा ठराविक वेळी साठी असु शकतो. ( उदा. १० किंवा १४ तासा साठी )
      
▪️ पार्श्वभूमी 

*काय आहे सीआरपीसी ?*

सीआरपीसी म्हणजेच भारतीय दंड विधान (Code of Criminal Procedure, 1973) भारतातील गुन्ह्यांसाठी कायदे आहेत. हे 1973 ला पारित करण्यात आले व 1 एप्रिल 1974 मध्ये लागू करण्यात आले. एखाद्या गुन्ह्यात आरोपी आणि पिडितासाठी जी प्रक्रिया राबवली जाते ती सीआरपीसीमध्ये देण्यात आलेली आहे.

               -.  @अभयराजे कापसे
                         Law Student   
                           SPPU Pune 
-------------------------------------------------
{ टिप :- वरील सर्व माहिती हि Reference Book मधुन तसेच माझ्या वाचनात आलेल्या Articles मधुन घेतलेली आहे.}