Pages

Sunday 23 January 2022

जमीन खरेदी व्यवहार नोंदविताना घ्यावयाची काळजी

 

⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*


❇️ जमीन खरेदी व्यवहार नोंदविताना घ्यावयाची काळजी:-

खरेदीखताच्या प्रत्यक्ष लिहिण्याच्या मजकुराचे स्वरूप: माहितीगार व्यक्तीकडून किंवा वकिलामार्फत व्यवहाराचे स्वरूप लिहिले गेले पाहिजे

1. जमिनीची नोंदणी रजिस्टर पद्धतीनेच केली पाहिजे. ५ रु . १० रु किंवा अन्य प्रकारच्या स्टॅम्प पेपर वर सह्या घेऊन व्यवहार पूर्ण होत नाही. भारतीय नोंदणी कायद्यानुसार १०० रुपयेपेक्षा जास्त किंमत असलेल्या मिळकतीच्या बाबतीत व्यवहार हा रजिस्टर असला पाहिजे.

2. शेत जमिनीत  जाण्याचा रस्ता, पाणीपुरवठ्याचे साधन शेततळे, विहीर,बोरवेल, झाडे, शेतघर, सामायिक विहिरीतील हिस्सा, आधी जमिनीत असल्याचा त्याचा उल्लेख खरेदी खत आवश्यक करावा.

3. जमीन बागायत आहे की जिरायती यावरून तिचा भाव ठरत असतो, जमिनीची किंमत व त्यानुसार स्टॅम्प रक्कम भरावी लागते. हे पहावे रजिष्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे व शासनाच्या नियमानुसार द्येय असणारी स्टॅम्प ड्युटी व रजिष्ट्रेशन फी याची खात्री केली पाहिजे.

4. रजिष्ट्रेशन च्या वेळी साक्षीदार हे प्रतिष्ठित व आपला शब्द न बदलणारे असले पाहिजे.

5. जमीन व्यवहार चालल्यास देय रक्कम बँकेमार्फत द्यावी त्याचा उल्लेख खरेदीखत करावा.

खरेदीखत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन बाजारभावाने आणि आपापसात ठरविलेल्या रकमेवर मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे.

मूल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधकाचे असते. त्यामध्ये जमिनीची सरकारी किंमत असते त्यावर मूल्यांकन करून  मुद्रांक शुल्क गृहीत धरला जातो.

मुद्रांक शुल्क काढून झाल्यावर दुय्यम निबंधक हे खरेदी खत दस्तऐवज यासाठी लावणारे, नोंदणी शुल्क व कागदपत्रे व इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. ही सर्व माहिती घेऊन दुय्यम निबंधक यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून, उदाहरणात, सर्वे नंबर, जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमीन मालकाचे नावे जमीन, खरेदी करणाऱ्यांचे प्रयोजन त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते. तसेच लागणारे सर्व कागदपत्रे जोडून खरेदी खत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटा एन्ट्री करण्यासाठी लागणारा इनपुट भरून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी साठी सादर करावा.

खरेदी खतासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1.   सातबारा.

2.   मुद्रांक शुल्क.

3.   आवश्यक असल्यास फेरफार.

4.   आठ अ

5.   मुद्रांकशुल्क ची पावती.

6.   दोन ओळखीच्या व्यक्ती त्यांची फोटो व आधार कार्ड

7.   आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र.

8.   आवश्यक असल्यास एन ए ऑर्डरची प्रत.

9.   आवश्यक असल्यास विक्री परवानगी ची प्रति.

10. खरेदी देणार व घेणार त्यांचे फोटो व ID Proof (आधार कार्ड)