Pages

Thursday 9 September 2021

जमीन खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

 

⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*

❇️ जमीन खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी



जमीन खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:-

वास्तविक जमिनीचे व्यवहार करण्यापूर्वी जमिनीच्या संदर्भात खरेदीदाराने खालील मुद्यांवर खात्री केली पाहिजे.

1 खरेदी करावयाच्या जमिनीचा चालू सातबारा पहा जमीन मालकाचे नाव पीक पाणी नोंदी आहेत का.

2  जमीन भोगवटादार वर्ग एक आहे, की देवस्थान इनाम आहे, की महार वतन कुळाची जमीन आहे, का याची खात्री करावी. वर्ग-2 म्हणजे नवीन अटी व शर्तीची जमीन असते त्यामुळे त्या अटी व शर्ती काय आहेत ते पाहावे.

3  जमिनीचा तीस वर्षापूर्वीचे सातबारा काढा, जमीन मालकाच्या नावाचे कशी झाली याची पडताळणी करावी. जर जमीन विकणाऱ्याला बहिणी असल्यास बहिणींचे म्हणणे जाणून घ्यावे.

4 जमीन वारस हक्काने लिखी स्वकष्टार्जित आहे हे पहा पहावे.

5 सातबारा उतारा च्या इतर हक्कात कुळ, अगर व्यक्तींचे आहे की नाही याची खातरजमा करावी. कूळ कायद्याची जमीन असल्यास जमीन मिळून दहा वर्ष झाले असेल, तर नजराना भरून खरेदीची परवानगी प्रांताधिकारी करून घ्यावे. दहा वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर कलम 43 नुसार आवश्यक कारवाई करून परवानगी घ्यावी. आधी खरेदी व नंतर परवानगी असा व्यवहार केल्यास तो रद्द होतो.

6 जमीन मालकाच्या सातबारावरील क्षेत्र व प्रत्यक्ष ताब्यात वहिवाटीत असलेले क्षेत्र तपासा.

7 आठ जमिनीवर कुणाचा बोजा आहे का पहावे

8 जमीन पुनर्वसन राखीव आहे का, लाभक्षेत्रात आहे का, ते पहावे.

9 जमिनीची गटवारी झाली असल्यास गटवारी चा उतारा काढून, गटवारी पूर्वीचे व गटवारी नंतर झालेल्या क्षेत्रातील बदल तपासून पहावे.

10 जमिनीत जाण्याचा रस्ता आहे की, बांधावरून रस्ता आहे त्याची खातरजमा करावी.

जमीन बाबत कोर्टकचेरी सुरू नाही ना याची खात्री करावी.

11 संभाव्य जमीन व्यवहारामुळे प्रस्थापित असलेल्या वत्याही कायद्याचा भंग होतो का? याची खात्री केली गेली पाहिजे. तुकडेबंदी कायदा, पुनर्वसन कायदा,भूसंपादन कायदा,नागरिकमल जमीन धारण कायदा इत्यादींचा समावेश होतो.

12 जमिनीच्या सातबारावर खाजगी वन, राखी वन, असा चेहरा असल्यास खरेदी करू नयेत.

13 जमीन व्यवहार चालल्यास देय रक्कम बँकेमार्फत द्यावी त्याचा उल्लेख खरेदीखत करावा.

14 जमीन मोजणी चा नकाशा पाहून जमिनीचा आकार पहावा.

15 जमीन मालकाने कर भरल्याची खात्री करावे.

16 व्यवहार हा बेनामी पद्धतीने करू नये. जमिनीचा व्यवहार  मालकाशी करावा मध्यमान मार्फत व्यवहार करताना, त्याला द्यावयाच्या कमिशन बोलली आधीच करावी.

17 कुलमुखत्यार पत्राच्या आधारे व्यवहार करताना संबंधित व्यक्तीने त्यास ते कुलमुखत्यारदृवारे दिले असल्याची खात्री करावी. तसेच कुलमुखत्यार पत्र करून देणारी व्यक्ती अस्तित्वात आहे का हे पहावे. शक्यतो नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र असेल तर व्यवहार करावा.

18 जमिनीचा झोन कुठला आहे ते पाहावे, उद्यानात रहिवाशी, शेती, शेती ना विकास, औद्योगिक इत्यादी.

19 नवीन शर्तीची जमीन घेताना आवश्यक त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे का नाही याची खातर जमा करावे. नवीन शर्तीची जमीन संबंधित परवानगी घेतल्याशिवाय खरेदी करू नये.

अभयराजे एकनाथ कापसे. 

LAW STUDENT, SPPU PUNE,

 ९३७३०००७०२ कोल्हापूर.

No comments:

Post a Comment