Pages

Tuesday 8 February 2022

सातबारा म्हणजे काय?

 

⚫ *जाणून घेऊया आपले कायदे व हक्क*


❇️ सातबारा म्हणजे काय?



हक्क नोंदणी

अधिकृत नोंद. अशा नोंदींची वही अधिकृतपणे ठेवण्यात येते. व्यवहारात अगर सार्वजनिक क्षेत्रात लेखी आधार अगर पुरावा म्हणून अशी नोंदवही साधारणपणे ग्राह्य समजली जाते.

हक्क नोंद हि प्रत्याकाच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे कारण यावर अनेख बाबी अवलंबून असतात. हक्क नोंद नाही केल्यास पुढे येणाऱ्या समस्या मध्ये खूप त्रास होऊ शकतो. आजही ज्यास्तकरून न्यायालयीन प्रकरणे हि हक्क व त्याच्या नोंद न होणे किंवा चुकीच्या नोंदी होणे हक्क डावलणे इ. संदर्भात आहेत. प्रथम १९०४ ते १९०६ च्या दरम्यान हक्क नोंदणी पत्रके तयार करण्यात आली. या नोंदीमधील मजकुराचे महत्व मोठे आहे . नोंदणी कायद्यानुसार सर्वच कागदपत्रे नोंदणीकृत करणे गरजेचे नाही.

काही कागदपत्रे अशी आहेत ज्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे ती पुढीलप्रमाणे : -

१. भेट स्वरूपात दिलेली स्थायी मालमत्ता.

२. भाडेतत्वावर दिलेली अस्थायी मालमत्ता (एक वर्षपेक्षा अधिक काळासाठी).

३. मालमत्तेचे हस्तांतरन होत असेल किंवा नवीन हक्काची निर्मिती होत असेल तर (मालमत्ता १०० रु. पेक्षा जास्त).

४. कोणतेही कागदपत्र ज्यायोगे कोर्टाचा एखादा निर्णय रु. १०० पेक्षा अधिक मालमता हस्तांतरित होते जिल्ह्याच्या नोंदणी कागदपत्र, करार बनवल्यापासून चार महिन्यांच्या आत करणे बंधनकारक आहे .

उदा. जन्म-मृत्यू, नोंदणी कारखाने नोंदणी, आयकरासाठी उत्पन्न नोंदणी वाहन नोंदणी, जमा-खर्च नोंदणी, परदेशीय व्यक्ती नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी, परवाना व एकस्व नोंदणी, संस्था नोंदणी, पुस्तक प्रसिद्धी नोंदणी, वर्तमानपत्र व नियतकालिके नोंदणी, धर्मार्थ संस्था नोंदणी, आकाशवाणी व दूरध्वनियंत्र नोंदणी, खानावळ व पानगृह नोंदणी, गुन्हा नोंदणी, दावे नोंदणी, विवाह नोंदणी, परदेशगमन परवाना नोंदणी इत्यादी._

_______________

सातबारा म्हणजे काय ?

जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.

जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी १-२१ अशी विभागणी केलेली असते. त्यातील ७ नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर १२ नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण ७/१२ मध्ये केलेले असते. महसूल विभागाची गावनिहाय माहिती ठेवण्यासाठी गावांमध्ये तलाठी हे पद कार्यरत आहे.

गावाच्या जमिनीची माहिती ज्यात असते त्याला गावनमूना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी १-२१ अशी विभागणी केलेली असते. त्यातील ७ नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर १२ नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण ७/१२ मध्ये केलेले असते.

७/१२ संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी :

१). ७/१२ हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.

२) ७/१२ बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.

३). ७/१२ पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .

४). प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.

५). ७/१२ त माकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार तलाठी यां ना नाही.

६). प्रतेक वेळी ७/१२ काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.

७). ७/१२ ची नविन पुस्तके साधारणता १० वर्षानी लिहिली जातात.

________________

गाव नमुना १२- परिपत्रक

गाव नमुना नंबर १२ हा पिकासंबंधीचा आहे.

गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंदी घेणे अभिप्रेत आहे. गाव नमुना नंबर १२ मध्ये दिलेल्या रकान्यातच पिकांच्या नोंदी कराव्यात व त्या खाली क्षेत्र लिहावे. गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंदी घेणे अभिप्रेत आहे. गाव नमुना नंबर १२ मध्ये दिलेल्या रकान्यातच पिकांच्या नोंदी कराव्यात व त्या खाली क्षेत्र लिहावे.

पीक पाहणीत खालील बाबी तपासाव्यात :

१. वहिवाटदाराचे नाव.

२. पीक कोणते आहे व किती क्षेत्रात आहे.

३. विहीर व इतर सिंचनाचे साधन .

४. क्षेत्रातील झाडांची संख्या.

५. पडीक जमीन प्रकार.

इत्यादी नोंदी असतात.

 

अभयराजे एकनाथ कापसे.

LAW STUDENT, SPPU PUNE,

९३७३०००७०२ कोल्हापूर.

No comments:

Post a Comment